कोईम्बतूर - 16 वर्षीय मुलीच्या घरी एक तरुण आढळल्याने त्याला त्या मुलीच्या नातेवाईकांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील पोलाची या गावात ही घटना घडली आहे.
कोईम्बतूरमध्ये मुलीच्या घरी तरुण आढळल्याने नातेवाईकांनी केली मारहाण, तरुणाचा मृत्यू गौथम असे त्या मृत तरुणाचे नाव असून तो पोलाचीजवळील चिनामापालयम गावचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी हा तरुण त्या मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी मुलीचे नातेवाईक बाहेर गावावरून लवकर घरी परतले आणि त्यावेळी हा तरुण त्यांच्या घरी असल्याचे समजले. त्यानंतर तरुण आणि मुलीच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच मुलीच्या नातेवाईकांपैकी तिघांनी त्या तरुणाला लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या मारहाणीत गौथम गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला पोलाची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलाची पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.