श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरे भागात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका विशेष पोलीस अधिकाऱ्यासह एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
सापोरे भागातील वारपोरा पोलीस ठाण्यावर काही दहशतवाद्यांनी आज (बुधवार) सायंकाळी गोळीबार केला. यामध्ये विशेष पोलीस अधिकारी वजाहत अहमद, शौकत खांडे आणि एका नागरिकाला जखम झाली होती. त्यानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.