महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : धार्मिक शहर तिरूपती आता आहे प्लास्टिमुक्त!

शहरातील साडेतीन लाख लोकांव्यतिरिक्त, लाखो लोक तिरूपतीला दररोज भेट देतात. यामुळेच शहरातील सिंगल यूज प्लास्टिक कचऱ्यामध्ये बरीच वाढ झाली होती. त्यामुळेच २ ऑक्टोबर २०१८ पासून तिरूपतीच्या महापालिकेने शहरात प्लास्टिक पिशव्यांना बंदी केली. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि काही संस्थांनी या प्लास्टिकविरोधात जनजागृती करण्यासाठी विविध मोर्चे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमाला "प्लास्टिक बहिष्कारणा जयभेरी" असे नाव दिले गेले होते. ज्याचा भरपूर चांगला परिणाम झाला.

By

Published : Jan 20, 2020, 4:41 PM IST

Spiritual city Tirupati goes plastic-free
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : धार्मिक शहर तिरूपती आता आहे प्लास्टिमुक्त!

अमरावती - राष्ट्रपिता महात्मा गांधींनी एका स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते. गांधीजींच्या स्वप्नातील "स्वच्छ भारत" होण्यास देशात सर्वात मोठा अडथळा आहे, तो म्हणजे, प्लास्टिक! आंध्र प्रदेशमधील धार्मिक शहर असलेले तिरूपती शहर हे याच प्लास्टिकमुक्तीसाठी लढत आहे. शहरातील लोकांनी केलेल्या या प्रयत्नांमुळेच आज या शहरातील प्लास्टिक कचऱ्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : धार्मिक शहर तिरूपती आता आहे प्लास्टिमुक्त!

शहरातील साडेतीन लाख लोकांव्यतिरिक्त, लाखो लोक तिरूपतीला दररोज भेट देतात. यामुळेच शहरातील सिंगल यूज प्लास्टिक कचऱ्यामध्ये बरीच वाढ झाली होती. त्यामुळेच २ ऑक्टोबर २०१८ पासून तिरूपतीच्या महापालिकेने शहरात प्लास्टिक पिशव्यांना बंदी केली. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि काही संस्थांनी या प्लास्टिकविरोधात जनजागृती करण्यासाठी विविध मोर्चे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमाला "प्लास्टिक बहिष्कारणा जयभेरी" असे नाव दिले गेले होते. ज्याचा भरपूर चांगला परिणाम झाला.

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये लोकांनी स्वतः आपापल्या घरातून प्लास्टिक पिशव्या आणून शहराच्या प्लास्टिक पुनर्वापर विभागाकडे त्या जमा केल्या. प्लास्टिक बंदी केल्यामुळे त्याजागी पर्यायी वस्तूंची गरज भासू लागली. या वस्तू पुरवण्याची जबाबदारी पालिकेने महिला बचत गटांकडे दिली. या महिलांच्या समूहांनी कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्यास सुरूवात केली. या माध्यमातून बऱ्याच महिला बचत गटांची चांगली कमाई होते आहे.

या माध्यमातून बनवण्यात आलेल्या कागदी आणि कापडी पिशव्या या तिरूमला-तिरूपती देवस्थानाच्या प्रसाद काऊंटरवर मिळू शकतात. सध्या शहरातील दोन मंदिरे अशा प्रकारच्या विशेष बॅग विकत आहेत. या उपक्रमासाठी तिरूपती संस्थानाचे देशभरातून कौतुक होते आहे. कारण या माध्यमातून केवळ पर्यावरणाचे संरक्षणच नाही, तर गरजूंना रोजगारही मिळत आहे.

हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : कर्नाटकच्या चिन्नास्वामी मैदानावर बसवण्यात आले 'प्लास्टिक बॉटल श्रेडर'!

ABOUT THE AUTHOR

...view details