नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 88 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 59 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.
गेल्या २४ तासांमध्ये ८८ हजार नव्या रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५९ हजारांवर!
काल दिवसभरात एकूण 1,124 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 94 हजार 503 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 59 लाख 92 हजार 533 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 56 हजार 402 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,124 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 94 हजार 503 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 59 लाख 92 हजार 533 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 56 हजार 402 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 49 लाख 41 हजार 628 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल दिवसभरात 9 लाख 87 हजार 861 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 12 लाख, 57 हजार 836 एवढी झाली आहे.