महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचा कहर...गेल्या 24 तासांमध्ये आढळले तब्बल 6 हजार 88 नवे रुग्ण

महाराष्ट्रामध्ये 41 हजार 642 कोरोनाबाधित असून 1 हजार 454 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 13 हजार 967 कोरोनाबाधित तर 94 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये 12 हजार 905 कोरोनाबाधित असून 773जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 11 हजार 659 कोरोनाबाधित तर 194 जणांचा मृत्यू झाला आहे.

#COVID19
#COVID19

By

Published : May 22, 2020, 10:57 AM IST

नवी दिल्ली -भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांनी 1 लाखाचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 6 हजार 88 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 24 तासात बाधित रुग्ण आढळलेला हा सर्वांत मोठा आकडा आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 18 हजार 447 झाला आहे, यात 66 हजार 330 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 48 हजार 503 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 3 हजार 583 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 41 हजार 642 कोरोनाबाधित असून 1 हजार 454 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 13 हजार 967 कोरोनाबाधित तर 94 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये 12 हजार 905 कोरोनाबाधित असून 773जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 11 हजार 659 कोरोनाबाधित तर 194 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत 18 मे ला भारताने एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. तसेच आज संपुर्ण भारतामध्ये एकूण 555 प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details