सिकंदराबाद - विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीएफ) हवालदाराने रविवारी सकाळी सिकंदराबाद येथे आपल्या रायफलने स्व:तवर गोळी झाडून आत्महत्या केली. मधु असे त्या हवालदाराचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या सुरक्षेसाठी तैनात होते.
सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांना सकाळी एक पोलीस रक्त्याच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.