महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#निरोप २०२० : राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या वर्षभरातील महत्वाच्या घटना - madhya pradesh by elections 2020

यंदाच्या वर्षाला निरोप देताना राष्ट्रीय स्तरावर घडलेल्या राजकीय घडामोडींचा लेखाजोखा 'ईटीव्ही भारत'या रिपोर्टमधून वाचकांसमोर आणत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतरही देशातील राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी झाल्या. फेब्रुवारी महिन्यातील दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतील अरविंद केजरीवाल यांचा विजय आणि लॉकडाऊननंतरच्या पहिल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाने मारलेली मुसंडी यामुळे देशभरात धुव्रीकरणाचे वातावरण होते.

political events in 2020
#निरोप २०२० : राष्ट्रीय राजणाकारणाला कलाटणी देणाऱ्या वर्षभरातील महत्वाच्या घटना

By

Published : Dec 24, 2020, 8:20 AM IST

Updated : Dec 24, 2020, 11:32 AM IST

हैदराबाद - यंदाच्या वर्षाला निरोप देताना राष्ट्रीय स्तरावर घडलेल्या राजकीय घडामोडींचा लेखाजोखा 'ईटीव्ही भारत'या रिपोर्टमधून वाचकांसमोर आणत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतरही देशातील राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी झाल्या. याच्या केंद्र स्थानी केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, आयोध्येतील राम मंदिर, अनेक क्षेत्रांत खासगीकरणाला मोदी सरकारने दिलेली परवानगी, हे विषय महत्वाचे ठरले.

अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

यासोबतच फेब्रुवारी महिन्यातील दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतील अरविंद केजरीवाल यांचा विजय आणि लॉकडाऊननंतरच्या पहिल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाने मारलेली मुसंडी यामुळे देशभरात धुव्रीकरणाचे वातावरण होते. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा सत्ताकेंद्र म्हणून झालेला उदय, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले. जाणून घ्या देशातील विविध स्थानिक राजकीय पटलांवर नक्की कोणकोणत्या महत्वाच्या घटनांनी ठसा उमटवला.

लॉकडाऊननंतर बिहारमध्ये पार पडलेल्या देशातील पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजपा यांच्या आघाडीने 125 जागा घेत विजय संपादन केला.

8 फेब्रुवारी : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पार्टीला 62 जागा मिळाल्या आणि अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या निवडणुकीत दिल्लीतील एकूण 62.82 टक्के लोकांनी मतदान केले.

लॉकडाऊननंतर बिहारमध्ये पार पडलेल्या देशातील पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजपा यांच्या आघाडीने 125 जागा घेत विजय संपादन केला.

10 नोव्हेंबर : लॉकडाऊननंतर बिहारमध्ये पार पडलेल्या देशातील पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजपा यांच्या आघाडीने 125 जागा घेत विजय संपादन केला. यामुळे नितीशकुमार यांची गादी वाचली आणि भाजपाची सत्तेत येण्याची संधी कायम राहिली. मात्र या संपूर्ण निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली, ती तेजस्वी यादव यांची! अखेर जदयु आणि भाजपाच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या महागटबंधनला 243 पैकी 110 जागा मिळाल्या. तसेच जनता दल युनायटेडला 75 तर, भाजपाला 43 जागांवर विजय मिळाला.

या संपूर्ण निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली, ती तेजस्वी यादव यांची!

यावर्षी अनेक राज्यांमध्ये रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका देखील पार पडल्या. त्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपाला फायदा झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाने केलेल्या हस्तक्षेपामुळे काही ठिकाणचे उमेदवार ऐनवेळी बदलण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामध्ये पक्षाचा बळी गेला.

  1. 10 नोव्हेंबर : मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांचे सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता होती. मात्र मध्यप्रदेशातील 28 जागांवर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने 19 जागा जिंकत सरकार वाचवले. आता मध्य प्रदेशात भाजपाकडे 123 जागा आहेत.
    मध्यप्रदेशातील 28 जागांवर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने 19 जागा जिंकत सरकार वाचवले.
  2. 3 नोव्हेंबर : गुजरातमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपने 8 पैकी 8 जागा मिळवत विजयी पताका बुलंद केली.
    गुजरातमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपने 8 पैकी 8 जागा मिळवत विजयी पताका बुलंद केली.
  3. 3 नोव्हेंबर :तेलंगणा राज्यात तेलंगणा राष्ट्र समितीच्या हातातील जागा भाजपाने मिळवत दुब्बकच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला.
  4. 3 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतील सात जागांवर मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा ६ तर समाजवादी पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
    उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतील सात जागांवर मोठ्या प्रमाणात राजकारण झाले.
  5. 7 नोव्हेंबर : मणिपूरच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला चार जागा मिळाल्या. तर उर्वरित एक जागा अपक्षाकडे केल्याने काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.
Last Updated : Dec 24, 2020, 11:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details