महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महिला दिन विशेष: 'वनांचा विश्वकोश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी तुलसी गौडा यांची कहाणी - तुलसी गौडा माहिती

'३५ वर्षांपासून मी झाडे लावत असून या कामाचा मला कंटाळा येत नसून आनंद होतो. आत्तापर्यंत किती झाडे लावली हे माहीत नाही. मला फक्त झाडे लावायला आवडते.

तुलसी गौडा
तुलसी गौडा

By

Published : Mar 3, 2020, 11:12 AM IST

Updated : Mar 3, 2020, 1:03 PM IST

बंगळुरू - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावर्षी पद्म पुरस्कार विजेत्या महिलांचा जीवन प्रवास आणि यशाची कहाणी आम्ही सर्वांसमोर आणत आहोत. यावर्षी पद्म पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये एक महिला अशी आहे ज्यांना 'एनसायक्लोपिडिया ऑफ फॉरेस्ट' म्हणजेच 'वनांचा विश्वकोश' असे म्हणले जाते. कर्नाटकातील ७४ वर्षांच्या तुलसी गौडा यांनी आपले संपूर्ण जीवन पर्यावरणासाठी समर्पित केले आहे. वृक्षांवर तुलसी आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करतात.

'वनांचा विश्वकोश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी तुलसी गौडा यांची कहाणी

कर्नाटकमधल्या अंकोला तालुक्यातील होनाल्ली गावात तुलसी राहतात. त्यांनी आत्तापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त झाडे लावली आहेत, त्यांचे आता वटवृक्षांत रुपांतर झाले आहे. अंकोला तालुका कर्नाटकातली किनारी भागात आहे. तुलसी या तेथील आदिवासी समाजीतल्या हलाक्की जमातीतील आहेत. होनाल्ली गावातील एका छोट्याश्या झोपडीत त्या राहतात. निसर्गावर त्यांचे अतूट प्रेम असून त्यांचे वृक्षप्रेम सर्वांना माहीत आहे. लोक त्यांच्याकडे झाडांची माहिती घेण्यासाठी येतात.

तुलसी गौडा यांचा सन्मान

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने आनंद झाल्याचे तुलसी सांगतात. गावकऱ्यांनाही त्यांचा अभिमान आहे. '३५ वर्षांपासून मी झाडे लावत असून या कामाचा मला कंटाळा येत नसून आनंद होतो. आत्तापर्यंत किती झाडे लावली हे माहित नाही. मला फक्त झाडे लावायला आवडते. सरकारने वृक्षतोड करायला नको, जर एक झाड तोडले तर दोन किंवा तीन झाडे लावायला पाहिजे, असे तुलसी सांगतात.

तुलसी गौडा

निसर्गाच्या प्रेमानं ओळख निर्माण करून दिली

तुलसी या अशिक्षित आहेत, मात्र, वृक्षांचे त्यांना संपूर्ण ज्ञान आहे. त्या आधी वनविभागामध्ये काम करत होत्या. मात्र, आता निवृत्त झाल्या आहेत. निवृत्त झाल्यानंतरही झाडांप्रती त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. जोपर्यंत झाड मोठे होत नाही, तोपर्यंत त्याची काळजी घेतात. गावात वृक्षतोडीलाही त्यांनी विरोध दर्शवला आहे.

तुलसी गौडा झाडाला पाणी घालताना

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

वने आणि वृक्षांना वाचवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तुलसी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी त्यांना कामाचा कर्नाटक सरकार आणि अन्य संस्थांनीही गौरव केला आहे. कर्नाटकाने त्यांना राज्योत्सव पुरस्कारनेही सन्मानित करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 3, 2020, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details