पाली (राजस्थान) -बरेच स्थलांतरित मजूर लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या राज्यात अडकले होते, अशा परिस्थितीत प्रत्येकालासुरक्षेच्या दृष्टीने घरी परत जायचे होते. अनेक संकटांवर मात करत मजूर आता त्याच्या घरी पोहोचले आहेत. परंतु घरवापसीनंतर अनेक समस्यांनी ते त्रस्त झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. लॉकडाऊननंतर घरी परतण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना केलेल्या देशातील जवळपास प्रत्येक मजुरांची ही कहाणी आहे. दु:ख भोगल्यानंतर हे लोक त्यांच्या घरी पोचले आहेत, परंतु आता या स्थलांतरितांसमोर सर्वात मोठे संकट म्हणजे त्यांच्या क्षेत्रात रोजगार शोधणे आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे.
पालीमध्येही असे संकट सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. प्रशासनापुढे मायदेशी परतलेल्या परप्रांतीयांना नोकरी व इतर व्यवस्था पुरविणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ईटीव्ही भारतने अशा प्रवासी मजुरांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या बोलण्यातून वेदना ओठावर आल्या.
सांगायचे म्हणजे, राज्यात पाली जिल्ह्यात सर्वाधिक परप्रांतीय आले आहेत. लॉकडाऊननंतर पालीतील सुमारे 1 लाख 88 हजार परप्रवासी मजुर आपल्या घरी परतले. हे सर्व प्रवासी राजस्थानच्या बाहेर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, हरियाणा, हिमाचल प्रदेश यासह अनेक राज्यांत नोकरीसाठी स्थायिक झाले होते.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे या सर्वांनी त्यांच्या या राज्यातील नोकऱ्या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत हे सर्व स्थलांतरित अनेक त्रास सहन करून आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या घरी परतले. पालीकडे परत आलेल्या परप्रांतीयांकडे पैसे शिल्लक होते तोपर्यंत त्यांचा निभाव लागला. परंतु आता या कामगारासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे कुटुंब चालवणे. आता या स्थलांतरितांना इतर राज्यात परत जायचे नाही. अशा परिस्थितीत हे लोक लॉकडाऊन हटल्यानंतर रोजगाराच्या संदर्भात शेतात भटकत आहेत, पण त्यांना रोजगार मिळत नाही. या स्थलांतरितांनी सरकारसमोर रोजगार उपलब्ध करुन द्यावा आणि विविध योजनांना जोडले जावे अशी मागणी केली आहे.