नवी दिल्ली - अवैध संपत्ती प्रकरणी पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकिर नाईक याला ३१ जुलैपर्यंत न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. झाकिर दिलेल्या वेळेत उपस्थित न राहिल्यास त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात येईल.
अवैध संपत्ती प्रकरणी वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकिर नाईकला ३१ जुलैपर्यंत न्यायालयात हजर होण्याचा आदेश - non bailable warrant
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) न्यायालयात झाकिरविरोधात अजामीनपात्र वॉरंटची मागणी केली आहे. झाकिर नाईकवर १९३.०६ कोटींच्या रुपयांच्या अवैध संपत्ती आणि गैरव्यवहाराचा आरोप आहे. अटकेच्या भीतीने नाईक २०१६ मध्ये मलेशियाला पळून गेला होता.

नाईक याच्या विरोधात २०१६ मध्ये दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जून २०१७ मध्ये न्यायालयाने त्याला गुन्हेगार घोषित केले होते. भारताकडून त्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. ईडीने मागील महिन्यात देशातील अनेक शहरांमधून नाईक याची मालमत्ता जप्त केली होती. तसेच, बँक खाती गोठवली होती.
'नाईकने जाणीवपूर्वक दुसऱ्या धर्मांच्या लोकांच्या धार्मिक विश्वास, भावनांना अपमानित केले आहे. ईडीच्या चौकशीत नाईक याने द्वेष पसरवणारी बहुतेक भाषणे २००७ ते २०११ दरम्यान केली होती, असे समोर आले होते,' असे राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआईए) च्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे.