महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-१९ - इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी विशेष विमान सेवा - कोरोना व्हायरस

इराणमधील एकाही भारतीयाला कोरोना विषाणूची लागण झाली नाही. कोरोनामुळे प्रभावित असलेल्या प्रत्येक देशात भारतीय दूतावास काम करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

CONVID-१९
इराणमध्ये अडकलेले भारतीय नागरिक

By

Published : Mar 6, 2020, 12:38 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना स्वदेशी आणण्यासाठी विशेष विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. इराणमध्ये २ हजारांपेक्षा जास्त भारतीय अडकून पडले आहेत. इराणमध्ये आत्तापर्यंत १०७ नागरिकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात अडकलेले इराणी नागरिकही विशेष विमानाने माघारी जाणार आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक आरोग्य आणीबाणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इराणमधील एकाही भारतीयाला कोरोना विषाणूची लागण झाली नाही. कोरोनामुळे प्रभावित असलेल्या प्रत्येक देशात भारतीय दुतावास काम करत आहे. इराणमधील भारतीय दूतावास तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही याबाबत माहिती दिली. जयशंकर म्हणाले, भारतीय पथक आज इराणला पोहचणार आहे. भारतीय पथक तेथे क्लिनीकही सुरू करणार आहे. त्यानंतर तत्काळ तपासणी सुरू करण्यात येणार आहे. भारतीय नागरिकांना माघारी भारतात आणण्यासाठी इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details