बरेली - आजपासून जवळपास ५० वर्षांआधी २० जुलै १९६९ ला मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवला होता. पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवणारी व्यक्ती म्हणजे नील आर्मस्ट्रॉग. याच नील आर्मस्ट्रॉग यांची एक खास निशाणी बरेली जिल्हात चर्चेचा विषय ठरत आहे. बरेलीतील एमैनुअल पैटर्स यांच्याकडे नील आर्मस्ट्रॉग यांचा ऑटोग्राफ आहे. जो ऑटोग्राफ त्यांनी खूप सांभाळून ठेवलेला आहे. हा ऑटोग्राफ जवळपास २५ वर्षे जुना आहे.
अचानक आला विचार -
'ईटीव्ही भारत'शी विषेश चर्चा करताना एमैनुअल पैटर्स यांनी सांगितले की, ही घटना १९९३ ची आहे. त्यावेळी त्यांना ५ ऑगस्टला नील आर्मस्ट्रॉग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण, त्यांच्याकडे नील आर्मस्ट्रॉग यांचा कोणताही पत्ता नसल्याने त्यांनी अमेरिकेच्या दुतावासाशी पत्रव्यवहार करून पत्ता मिळवला. यानंतर मिळालेल्या पत्यावर एमैनुअल पैटर्स यांनी नील आर्मस्ट्रॉग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. याघटनेच्या काही दिवसांनंतर नील आर्मस्ट्रॉग यांनी आपला ऑटोग्राफ आणि एक फोटो एमैनुअल पैटर्स यांना पाठवला होता.