महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जिम कॉर्बेट यांची जयंती ; ह्रदय परिवर्तन झाल्याने व्याघ्रसंवर्धनाचे केले काम

जिम कॉर्बेट यांनी जीवनभरात 6 पुस्तके लिहिली. त्यांच्या शिकारीचे अनुभव आणि रोमांचकारी घटना या कारणांनी हे पुस्तके वाचकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत.

जिम कॉर्बेट
जिम कॉर्बेट

By

Published : Jul 25, 2020, 2:06 PM IST

रामनगर –जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्याचे नाव तुम्ही ऐकले असेल. या प्राणी अभयारण्याचे नाव असलेल्या जेम्स एडवर्ड जिम कॉर्बेट यांची आज जयंती आहे. कॉर्बेट यांनी काही नरभक्षक वाघ आणि बिबट्यांची शिकार करत लोकांना भयमुक्त केले होते. कुशल शिकारी ते प्राणीप्रेमी असा त्यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

जेम्स एडवर्ड जिम कॉर्बेट यांचा 25 जुलै 1875 ला नैनीतालमध्ये जन्म झाला. नैनीताल आणि परिसरातील मातीशी त्यांचे कायम ऋणानुबंध तयार झाले. त्यांनी तरुणपणात पश्चिम बंगालमध्ये रेल्वेत नोकरी सुरू केली. मात्र, त्यांना नैनीतालचा परिसर पुन्हा खुणावू लागला..त्यानंतर ते पुन्हा नैनीतालमध्ये परतले. जिम कॉर्बेट यांनी 1915 मध्ये कालाढूंगी क्षेत्रात जमीन खरेदी केली. हिवाळ्यात राहण्यासाठी त्यांनी तिथे एक घर बांधले. उन्हाळ्यात जिम हे नैनीतालमध्ये राहण्यासाठी येत असत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना 221 एकर शेतजमीन आणि राहण्यासाठी जागा दिली. हा परिसर आज छोटी हल्दवानी नावाने परिचित आहे. येथे आजही देश-विदेशातील पर्यटक फिरण्यासाठी येतात.

जिम यांच्या घराचे संग्रहालयात रुपांतरण-

जिम हे 1947 मध्ये विदेशात गेले. त्यावेळी त्यांनी कालाढूंगीमधील घर हे मित्र चिरंजी लाल शाह यांना दिले. 1965 मध्ये वनमंत्री चरण सिंह चौधरी यांनी जिम कॉर्बेट यांचे घर 20 हजार रुपयांना खरेदी केले. हे घर वनखात्याला सुपूर्द करत संग्रहालयात बदलण्यात आले आहे. देश-विदेशातील पर्यटक जिम यांच्या घराला आवर्जून भेट देत जिम यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू पाहतात.

जिम कार्बेट यांनी 6 पुस्तकांचे केले लेखन

जिम कॉर्बेट यांनी जीवनभरात 6 पुस्तके लिहिली. त्यांच्या शिकारीचे अनुभव आणि रोमांचकारी घटना या कारणांनी हे पुस्तके वाचकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत.

जिम कॉर्बेट का आहेत लोकप्रिय

जिम कॉर्बेट एक कुशल शिकारी होते. नरभक्षक वाघांना मारण्यासाठी जिम कॉर्बेट यांना इंग्रज सरकारकडून बोलावणे येत असे. गढवाल आणि कुमाऊसह अनेक ठिकाणचे नरभक्षक वाघ त्यांनी ठार केले होते.

जिम कॉर्बेट हे चांगले शिकारी म्हणून प्रसिद्ध होते. अनेक नरभक्षक प्राण्यांची शिकार केल्यानंतर त्यांच्या मनात प्राण्यांबद्दलचे प्रेम वाढले. शिकारी ते प्राणीप्रेमी असे त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने त्यांनी वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर त्यांनी कधीही वाघ अथवा इतर वन्यप्राण्याला मारण्यासाठी हातात बंदूक घेतली नाही. जिम यांनी सामाजिक कार्यातही योगदान दिले. त्यांच्या सन्मानार्थ 1955 मध्ये राम गंगा नॅशनल पार्कला कॉर्बेट नॅशनल पार्क असे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे हे पार्क आज वाघांची राजधानी मानली जाते. जगभरातील हजारो पर्यटक येथील वाघांना पाहण्यासाठी भेटी देतात.

ABOUT THE AUTHOR

...view details