लखनऊ- बाबरी मस्जिद्द प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना समन्स बजावले आहेत. २७ सप्टेंबरला सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयने कागदपत्रांची पुर्तता केली नसली तरी त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बाबरी मस्जिद प्रकरणी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंहांना सीबीआयकडून समन्स - special cbi court
बाबरी मस्जिद्द प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना समन्स बजावले आहे.
राजस्थानच्या राज्यपाल पदावरुन पायउतार झाल्यानंतर या प्रकरणा संबधी कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आदेश सीबीआय न्यायालयाने दिले होते. मात्र, त्यानंतरही सीबीआय कागदपत्रे जमा करु शकली नव्हती. मात्र, तरीही सीबीआयने कल्याणसिंह यांना समन्स बजावले आहेत.
अयोध्यातील बाबरी मस्जिद पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू आहे. तसेच या प्रकरणी अनेक न्यायालयांमध्ये खटले सरू आहेत. २०१७ सालापासूनच सीबीआय कल्याण सिहं यांची चौकशी करण्याचे प्रयत्न करत होती. मात्र, त्यावेळी कल्याणसिंह राजस्थानचे राज्यपाल होते. त्यामुळे तपास थांबला होता. मात्र, आता पुन्हा या प्रकरणी तपास सुरू झाला आहे.