पटना- भारतामधून मूल दत्तक घेण्याचे एका परदेशी जोडप्याचं स्वप्न तब्बल ३ वर्षानंतर पूर्ण झालं. स्पेनमधील हे जोडपं तीन वर्षापूर्वी उत्तरप्रदेशात मूल दत्तक घेण्यासाठी आले होते. सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण केल्यानंतर उत्तरप्रदेशातील सीतापूर येथील अनाथ कार्तिकचा ताबा या जोडप्याला मिळाला. मुलाचं स्वप्न पूर्ण झाल्यानं या जोडप्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.
मार्कोस अॅन्टिनिओ गोम्झे आणि मारीया लुसिया कॅल्वोडेल हे दोघेही स्पेनचे रहिवासी आहेत. उत्तरप्रदेशामध्ये त्यांनी दत्तक घेण्यासाठी मुलाचा शोध सुरू केला होता. सीतापूर जिल्ह्यातील ७ वर्षीय कार्तिकला दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, मूल दत्तक घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्यास त्यांना तीन वर्ष लागले. त्यानंतर या जोडप्याला कार्तिकचा ताबा मिळाला.