लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी' नॅशनल मिशन फॉर क्लिन गंगा' या अभियानाच्या एका बैठकीसाठी उत्तरप्रदेशची राजधानी कानपूरला पोहोचले आहेत. या पार्श्वभुमीवर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदींवर टीका केली आहे.
हेही वाचा -फारूख अब्दुल्ला यांची नजरकैद तीन महिन्यांनी वाढवली
गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणि प्रदूषण मुक्तीसाठी मोदी कानपूरमध्ये मोठी बैठक घेत आहेत, असे ऐकण्यात आलं आहे. तेथे पाहणीवेळी गंगा नदीला मिळणाऱ्या नाल्यांची दिशा बदलली जाईल, आणि खोटी खोटी सफाई केली जाईल. त्याऐवजी पंतप्रधानांनी आधी भ्रष्टाचाराचं गोमुखं साफ करावं, नंतरच कानपूरला यावं, असा सल्ला अखिलेश यादव यांनी मोदींना दिला आहे.
हेही वाचा -'मरण पत्करेन पण माफी मागणार नाही.. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही'
पंतप्रधान मोदी एक दिवसीय उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि केंद्रीय मंत्री आहेत.