नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सरकार स्थापन केले. त्यावरून भाजपवर टीका होत आहे. 'राज्यात ज्यांचे राज्यपाल त्यांचेच सरकार', अशी घणाघाती टीका अखिलेश यादव यांनी भाजपवर केली आहे.
'राज्यात ज्यांचे राज्यपाल त्यांचेच सरकार' अखिलेश यादव यांची भाजपवर टीका - MaharashtraGovtFormation
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सरकार स्थापन केले. त्यावरून भाजपवर टीका होत आहे.
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या राजकीय नाट्यमय घडामोडींनी वेगळे वळण घेतले असून भाजपने आज सकाळी सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधीनंतर विविध क्षेत्रांतून आणि नागरिकांमधूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. 'असे वाटते की, राज्यात ज्यांचे राज्यपाल त्यांचेच सरकार' अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला होता. मात्र, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.