नवी दिल्ली- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. येत्या ७ जूनपर्यंत महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.
खुशखबर! केरळमध्ये मान्सून दाखल, सात दिवसांत महाराष्ट्रात येण्याची शक्यता - maharashtra monsoon news
काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने पत्रकार परिषद घेऊन यंदा मान्सून वेळेत येणार असल्याचे सांगितले होते. तसेच यंदा सरासरी पाऊस देखील चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
खुशखबर! केरळमध्ये मान्सूनचे आगमन, सात दिवसात महाराष्ट्रात येण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने पत्रकार परिषद घेऊन यंदा मान्सून वेळेत येणार असल्याचे सांगितले होते. तसेच यंदा सरासरी पाऊस देखील चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर ३० मे रोजी स्कायमेटने मान्सून दाखल झाल्याचे घोषित केले होते. त्यावर भारतीय हवामान खात्याने आक्षेप घेतला. मात्र, आज हवामान खात्यानेच मान्सूनचे आगमन झाले असल्याचे जाहीर केले आहे.
Last Updated : Jun 1, 2020, 2:34 PM IST