कोलकाता- बीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिक्रेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यावर राजकारणात प्रवेश करण्यावर दबाब असल्याचे वक्तव्य सीपीआयएम नेते अशोक भट्टाचार्य यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात वादळ उठले होते. सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्याला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.
सौरव भाजपात जाणार?
सौरव गांगुली या वर्षी एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश करेल, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, गांगुलीकडून अद्याप याबाबत कोणतीहे स्पष्टीकरण देण्यात आले नाही, किंवा तसे कोणतेही सुचित वक्तव्य करण्यात आलेले नाही.
शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कोलकात्यामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीवर एंजियोप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर गांगुलीशी अनेक दिवासांपासून कौटुंबिक चांगले संबंध असलेले भट्टाचार्य हे गांगुलीच्या तब्बेतीची विचारपूस करण्याकरिता रुग्णालयात गेले होते. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की‘‘काही लोक गांगुलीचा राजकीयदृष्ट्या वापर करू इच्छितात. त्यामुळे ते दबावात असण्याची शक्यता आहे. मात्र गांगुली राजकीय विचार सरणीचे नाहीत. त्यांना एक उत्कृष्ट क्रिकेट पटू म्हणून ओळखले जाते.