महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, मात्र डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Sourav Ganguly stable
सौरव गांगुली प्रकृती

By

Published : Jan 4, 2021, 8:18 AM IST

Updated : Jan 4, 2021, 11:41 AM IST

कोलकाता -भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या ह्रदयात तीन ब्लॉक्स असल्याचे शनिवारी समजले होते.

प्रकृती स्थिर

रात्री सौरव यांना अस्वस्थ वाटत होते. मात्र आता त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा रक्तदाब 110/70 असून ऑक्सिजन पातळी 98 टक्के आहे. सौरव यांची प्रकृती पाहून आणखी एक अँजिओप्लास्टी करण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र या बाबतचा निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कम बॅक दादा

सकाळी उठल्यानंतर सौरवने नाश्ता केला, वृत्तपत्र वाचले आणि स्टाफशी गप्पा मारल्या. त्याचा इसीजी करुन ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आल्याचे डॉक्टरानी सांगितले. तर माजी क्रिकेटपटूच्या चाहत्यांनी हॉस्पिटलबाहेर 'कम बॅक दादा' असे पोस्टर्स लावले आहेत.

सीपीआयएमचा आरोप

बीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिक्रेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यावर राजकारणात प्रवेश करण्यावर दबाब असल्याचे वक्तव्य सीपीआयएम नेते अशोक भट्टाचार्य यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात वादळ उठले होते. सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्याला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

सौरव भाजपात जाणार?

सौरव गांगुली या वर्षी एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश करेल, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, गांगुलीकडून अद्याप याबाबत कोणतीहे स्पष्टीकरण देण्यात आले नाही, किंवा तसे कोणतेही सुचित वक्तव्य करण्यात आलेले नाही.

शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कोलकात्यामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीवर एंजियोप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर गांगुलीशी अनेक दिवासांपासून कौटुंबिक चांगले संबंध असलेले भट्टाचार्य हे गांगुलीच्या तब्बेतीची विचारपूस करण्याकरिता रुग्णालयात गेले होते. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की‘‘काही लोक गांगुलीचा राजकीयदृष्ट्या वापर करू इच्छितात. त्यामुळे ते दबावात असण्याची शक्यता आहे. मात्र गांगुली राजकीय विचार सरणीचे नाहीत. त्यांना एक उत्कृष्ट क्रिकेट पटू म्हणून ओळखले जाते.

भट्टाचार्य पुढे म्हणाले की, सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी दबाव टाकायला नको. मी गेल्या आठवड्यात त्यांना राजकारणात न येण्याचा सल्ला दिला होता. त्यांनीही माझ्या सुचनेकडे दुर्लक्षही केले नाही.

काही लोक राजकारण करतात-

भट्टाचार्य यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी मंत्री आणि भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, ‘‘काही लोक आपल्या कोत्या मानसिकतेमुळे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करतात. मात्र, गांगुलीचे लाखो चाहत्या प्रमाणे आम्हीही ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो , असे म्हटले आहे.

तृणमूलकडून ऑफर नाही-

तसेच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री शोभनदेव भट्टाचार्य यांनी देखील सौरव गांगुलीला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारणा करण्यात आली नाही. तसे प्रयत्नही झाले नसल्याचे म्हटले आहे. आम्हाला तो एक चांगला खेळाडू आहे, याचा गर्व असल्याची प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षरित्या गांगुलीस राजकारणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा -फॅशन डिझायनरने केला सीएवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Last Updated : Jan 4, 2021, 11:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details