नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा प्रसार भारतात अद्यापही थांबलेला नाही. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही ट्विटरद्वारे त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कोरोनाविरोधात लढणाऱ्यांना सोनिया गांधींनी संबोधले 'देशभक्त' - PM Modi
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही ट्विटरद्वारे त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
सोनिया गांधी
कोरोना संकटासमोर डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, पोलिसांसह इतर प्रशासकीय अधिकारी ठामपणे उभे आहेत. यांच्या कार्याहून मोठी कोणतीही देशभक्ती नाही. आपण एकता अनुशासन आणि आत्मबल या तीन गुणांवर कोरोनाला पराजित करू, धैर्य आणि संयम राखल्याबद्दल देशवासीयांचे आभार, असे ट्विटद्वारे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९०५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९,३५२ वर पोहोचली आहे.