महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उद्धव ठाकरेंच्या शपथविधी समारंभाला 'हे' दिग्गज राहणार उपस्थित - farmers invitees for oath ceremony

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे सायंकाळी ६:४० वाजता मुख्यमंत्रीपदाची कार्यालय आणि गोपनीयतेची शपथ घेतील. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील ४०० शेतकरी या वेळी उपस्थित राहतील.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 'हे' दिग्गज राहणार उपस्थित
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 'हे' दिग्गज राहणार उपस्थित

By

Published : Nov 27, 2019, 10:50 PM IST

मुंबई -काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

याशिवाय अनेक राजकीय नेत्यांनाही निमंत्रणे गेली आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याविषयी माहिती दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे सायंकाळी ६:४० वाजता मुख्यमंत्रीपदाची कार्यालय आणि गोपनीयतेची शपथ घेतील. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील ४०० शेतकरी या वेळी उपस्थित राहतील.

शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी बोलावून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांची तिन्ही पक्षांच्या आघाडीचे नेते म्हणून एकमताने निवड झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details