नवी दिल्ली- देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे युद्धपातळीवर काम सुरू आहे. अशातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून कोरोना विरोधात लढण्यासाठी पर्याय सुचविले आहेत.
प्रधानमंत्री, मंत्री आणि इतर संसद सदस्यांच्या वेतनात एक वर्षासाठी 30 टक्क्यांची कपात करण्यात येईल. तसेच खासदारांना दिला जाणार निधी दोन वर्षांसाठी बंद करण्यात यावा, असा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत झाला होता. या निर्णयाचे सोनिया गांधी यांनी समर्थन केले आहे. या सोबतच त्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला पाच मुद्दे सुचविले आहेत.
कोणते पाच मुद्दे सोनिया गांधीनी सुचविले
१) सरकारद्वारे टेलिव्हिजन, प्रिंट आणि ऑनलाइन मीडियाला दिल्या जाणाऱ्या सगळ्या जाहिराती थांबवण्यात याव्यात. दोन वर्षांसाठी हा निर्णय घेतला तर १२५० कोटींची बचत दरवर्षी होईल. हा निधी कोरोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरु शकतो. फक्त कोरोनाशी संबधीत जाहीरीतींना परवानगी असावी.