महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी कायम; पुढील ६ महिन्यात अध्यक्षाची होणार निवड

गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या मुख्मंत्र्यांनी गांधी कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी अथवा सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पक्षात नेतृत्वावरून मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे.

काँग्रेस
काँग्रेस

By

Published : Aug 24, 2020, 12:54 PM IST

Updated : Aug 24, 2020, 7:50 PM IST

नवी दिल्ली – काँग्रेसच कार्यकारणी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पुढील ६ महिन्यात पक्ष अध्यक्षांची निवड करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

17:25बैठकीच्या शेवटी सोनिया गांधी म्हणाल्या, आपण एक मोठा परिवार आहोत. आपल्यात अनेक मतभेद आहेत. मात्र सरतेशेवटी आपण सर्व एकत्र येतो. या देशातील जनता आणि सैनिकांसाठी आपण एकत्र आलोच पाहिजे. ही काळाची गरज आहे. अशी माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.

17:15पक्षातील अंतर्गत मुद्यांबाबत माध्यमे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जाणून घेता येत नाही. त्यामुळे संबंधीतांना कार्यकारणीची विनंती आहे की, कोणताही मुद्दा उपस्थित करण्यापुर्वी त्याची पृष्टी करुन घेणे गरजेचे आहे, सोबतच कोणतेही मुद्दे फक्त पक्षाच्या व्यासपिठावरच उपस्थित करावे अशी सूचना के. सी वेनुगोपाल यांनी केली आहे.

19:00पक्ष कार्यकारणीच्या बैठकीनंतर पक्षातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यात बैठकीतील ठळक मुद्यांची माहिती माध्यमांना देण्यात आली.

18:30सदस्यांची सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्यावर श्रद्धा आहे. यामुळेच सर्वांनी त्यांना पक्ष अध्यक्ष होण्याची पार्थना केली आणि त्यांनी ती स्विकरली. पुढील बैठक लवकरात लवकर आणि ६ महिन्यांच्या आत होणार असून तो पर्यंत अध्यक्ष पद सांभळण्याला सोनिया गांधींनी संमती दर्शवली आहे. अशी माहिती पी. एल. पुनिया यांनी दिली आहे.

18:25सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहणार असून लवकरात लवकर अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच काँग्रेस पक्षात नेतृत्ता संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. असे गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक आणि आनंद शर्मा यांनी लिहून दिले आहे. बैठकीनंतर अशी माहिती काँग्रेस नेते के. एच. मुनीयप्पा यांनी दिली आहे.

18:08सोनिया गांधी यांची काँग्रेस हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यासह पुढील ६ महिन्यात अध्यक्षाची निवड करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

15:47 गुलाम नबी आझादांना काँगेसची B टीम संबोधले जात आहे. पक्षाचे माजी अध्यक्षच त्यांचे भाजपसोबत संगनमत असल्याचे बोलत आहेत. असे असताना काँग्रेस पक्षातील मुस्लीम नेत्यांनी विचार करायला हवा की, ते कधीपर्यंत काँग्रेस पक्षातील नेतृत्वाच्या मागे असेच उभे राहतील - असदुद्दीन ओवेसी

15:40 राहुल गांधींनी कधीही लिहिलेलं पत्र भाजपच्या संगनमताने असल्याचे म्हटले नाही. ना ते असे बैठकीत बोलले ना बैठकीच्या बाहेर - गुलाम नबी आझाद

14:22 राहुल यांनी पुन्हा व्हावे अध्यक्ष - अहमद पटेल

पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी राहुल हेच पक्ष नेतृत्वासाठी योग्य असल्याचा दावा केला आहे. यासोबतच राहुल यांनी पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

13:53 राहुल गांधींनी मला व्यक्तिगत सूचित केले आहे, की त्यांनी मला कोणत्याही बाबीसाठी जबाबदार ठरवलेले नाही. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेतोय.

कपिल सिब्बलांनी ट्विट घेतले मागे

13:30राहुल गांधींनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नसून माध्यमांमध्ये चुकीची माहिती दाखवण्यात येत आहे. दरम्यान आपण आपसात नाही तर मोदी सरकार विरोधात एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.

रणदीप सुरजेवालांचे ट्विट

12: 59 राहुल यांनी केलेल्या वक्तव्यावर कपील सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कपिल सिब्बल म्हणाले, मागील ३० वर्षात मी भाजपच्या पक्षात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तरीही माझ्यावर भाजपशी हातमिळवणी असल्याचा आरोप केला जातो.

कपिल सिब्बल नाराज

तर गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. आझाद म्हणाले, मी भाजपच्या सोबत असल्याचे सिद्ध होताच मी राजीनामा देणार.

गुलाम नबी आझादांची राजीनामा देण्याची तयारी

12:12 सोनिया गांधींनी पद सोडू नये - ए. के. एंटनी

ए. के. एंटनी यांनी सोनिया गांधींना अध्यक्ष पदावरून न उतरण्याची विनंती केली आहे. यासह त्यांनी पत्रावर असहमती दर्शवली असून अशा कृतींमधून पक्ष कमजोर होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

12:02 राहुल गांधींनी 'पत्रा'संदर्भात विरारले प्रश्न -

राहूल गांधींनी पत्र लिहीण्याच्या वेळे संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. राहूल यांच्या मते हे पत्र राजस्थान किंवा मध्यप्रदेशच्या निवडणुकीवेळी का लिहीण्यात आलं नाही? असे राहुल यांनी विचारले आहे. यासोबतच सुरू असलेल्या प्रकारामागे भाजपचा हात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल यांच्या मते पत्र लिहिणारे भाजपशी मिळालेले आहेत. यामुळेच सोनिया गांधी रुग्णालयात भर्ती असताना अशा प्रकारचे पत्र लिहिण्यात आले आहे.

11:53 सोनिया गांधी बैठकीत झाल्या उपस्थित

सोनिया गांधी बैठकीत उपस्थित

11:00 मनमोहन सिंग, प्रियंका गांधी वाड्रा, कैप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह काँग्रेस नेते बैठकीत हजर

काँग्रेस कार्यकारणीची बैठक सुरू

10:55 काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया कांग्रेस कमेटी (AICC) कार्यालयाबाहेर जोरदारे निदर्शन केले. पक्षाचा अध्यक्ष गांधी परिवारातूनच असला पाहिजे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

काँग्रेस कार्यकारत्यांचे निदर्शन

सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, की काँग्रेसच्या वरिष्ठ 20 नेत्यांनी पाठविलेल्या पत्रावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाल्याने 73 वर्षांच्या गांधी या उदास आहेत. काँग्रेसच्या 20 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व असावे, अशी मागणी करणारे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षात 'हाय वोल्टेज ड्रामा' सुरू झाल्याचे सूत्राने सांगितले.

दरम्यान, सोनिया गांधी यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून 10 ऑगस्ट 2019 ला नियुक्ती झाली होती . राहुल गांधींनी 2019मधील लोकसभा निवडणुकीचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया या अंतरिम अध्यक्ष म्हणून पक्षाचे कामकाज पाहत आहेत. तत्कालीन काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हाही काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व कोणी करावे, या विषयावरून वादंग निर्माण झाले होते.

गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या मुख्मंत्र्यांनी गांधी कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी अथवा सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पक्षात नेतृत्वावरून मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याचे सूत्राने सांगितले. मात्र, ते मोदी सरकारविरोधात सक्रिय आहेत. ते पक्षाची जबाबदारी साभांळू शकतात, असा सूत्राने विश्वास व्यक्त केला.

सोनिया गांधींना लिहिण्यात आलेले पत्र

हेही वाचा -सुनिल केदार त्यांच्या मागणीवर ठाम; तर यशोमती ठाकूर यांची राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी

Last Updated : Aug 24, 2020, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details