महाराष्ट्र

maharashtra

हरियाणातील सोनिया गांधीची सभा रद्द, राहुल गांधी घेणार सभा

By

Published : Oct 18, 2019, 11:16 AM IST

हरियाणातील महेंद्रगड मतदारसंघात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची सभा होणार होती. मात्र, त्यांची सभा रद्द झाली असून त्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी सभा घेणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

चंदीगड- हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. काँग्रेस भाजप दोघांकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे. आज (शुक्रवार) राज्यातील महेंद्रगड मतदारसंघात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची सभा होणार होती. मात्र, त्यांची सभा रद्द झाली असून त्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी सभा घेणार आहेत.

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील हरियाणा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. आज हरियाणातील सोनिपत आणि हिसारमध्ये मोदींच्या दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज भाजप आणि काँग्रेसचे दिग्गज नेते काय बोलतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधील मुख्य बाबी-

महिलांना रोजगारासाठी 33 टक्के आरक्षण, प्रत्येक कुंटुंबामध्ये योग्यतेनुसार नोकरी, शेतकऱ्यासह गरिबांची कर्जमाफी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार, दलितांना शिष्यवृती, विद्यार्थ्यांना पहिलीपासून दहावीपर्यंत १२ हजार रुपये शिष्यवृती अशी अनेक वचन जाहिरनाम्यामध्ये काँग्रेसन दिली आहेत.

तर भाजपने 'म्हारो सपनो का हरियाणा' म्हणजेच माझ्या स्वप्नातील हरियाणा या नावाने निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. यामध्ये हरियाणा स्टार्टअप मिशन, युवा विकास आणि रोजगार मंत्रालयाची स्थापना, राज्यासाठी एक ऑल इंडिया मेडिकल इस्टिट्यूट(एम्स) आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासने दिले आहे.

हरियाणामध्ये राज्य विधानसभेची निवडणुक २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details