नवी दिल्ली - देश कोरोनासारख्या संकटाच असतानाही भाजप सरकारवर आरोप करुन काँग्रेस प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी नागरिकांना चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी केले आहेत.
सोनिया गांधी जनतेला भरकटत नेण्याचा प्रयत्न करत आहेत; भाजपची टीका - कोरोना संकट
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींना पाच सल्ले दिले आहेत. मात्र, याचा भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोना संकटाच्या काळात राजकीय मतभेद विसरुन एकत्र काम करणे अपेक्षित आहे. काँग्रेस मात्र, याचा फायदा घेत असल्याचे भाजप प्रवक्ते शहनवाज हुसैन म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींना पाच सल्ले दिले आहेत. मात्र, याचा भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. केंद्र सरकार कोरोनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. काँग्रेसने अगोदर त्यांची सत्ता असलेल्या राज्यांना केंद्र सरकारने जारी केलेल्या उपाययोजना आणि सुचनांचे पालन करण्याचे सांगावे त्यानंतर भाजप सरकारला सल्ले द्यावेत, असे मत शहनवाज हुसैन यांनी व्यक्त केले.
सोनिया गांधींनी लिहिलेल्या पत्रात, दोन वर्षांसाठी माध्यमांतील जाहिराती थांबवणे, ‘सेंट्रल विस्टा’ सारखे सुशोभिकरण प्रकल्प थांबवणे यासारख्या काही सुचना पंतप्रधान मोंदींना केल्या होत्या. या माध्यमातून सोनिया देशातील जनतेला भरकटत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना संकटाच्या काळात राजकीय मतभेद विसरुन एकत्र काम करणे अपेक्षित आहे. काँग्रेस मात्र, याचा फायदा घेत असल्याचे हुसैन म्हणाले.