महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका - Sonia Gandhi hit out BJP

नागरिक्तव सुधारणा विधेयकावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

सोनिया गांधी
सोनिया गांधी

By

Published : Dec 16, 2019, 6:14 PM IST

नवी दिल्ली - नागरिक्तव सुधारणा विधेयकावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी बनली आहे, असे सोनिया गांधी यांनी पक्षाकडून जारी केलेल्या परीपत्रकामध्ये म्हटले आहे.

मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी बनली आहे. देशाला अंधकारच्या खाईत लोटले असून युवकांचे भविष्य खराब केले आहे. देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे सरकारचे काम आहे. मात्र मोदी सरकार देशातील नागरिकांवर हल्ला करत आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.जर सरकारच देशामधील युवकांवर हल्ला करेल, देशामध्ये हिंसा पसरवेल, संविधानाची हत्या करेल, तर देशाची व्यवस्था कशी चालेल, असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.आसाम, त्रिपुरा आणि मेघालयामधील परिस्थिती चिघळली आहे. एकट्या आसाममध्ये पोलिसांच्या गोळ्यांनी चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. स्वत: गृहमंत्री अमित शहा यांची ईशान्य भारत फिरण्याची हिम्मत नाही. त्यांनी बांगलादेशाच्या प्रतिनिधीचा त्यानंतर जपानच्या पंतप्रधानांचा भारत दौरे रद्द केला, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

मोदी सरकार आणि त्याचे मंत्री संपूर्ण देशातील तरुण हे अतिरेकी, नक्षलवादी, फुटीरवादी, देशद्रोही असल्याचे सिद्ध करण्यात व्यस्त आहेत. जेव्हा युवाशक्ती जागृत होते. तेव्हा देशात एक नवीन बदल होतो. भाजपचा अंहकार आणि पोलिसांच्या लाठीमाराणे सुरू झालेली ही दडपशाही हा मोदीं सरकाच्या अंताची सुरवात आहे, असे सोनिया गांधी यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details