नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 30 जुलैला सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या बोर्ट समिती चेअरमनने दिली.
सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर; नियमित चाचण्यांसाठी केले होते रुग्णालयात दाखल - सर गंगाराम रुग्णालय
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 30 जुलैला सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तब्बेत स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, गुरुवारी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती, आदी विषयांवर चर्चा झाली होती. तसेच काही नेत्यांकडून राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावं, अशी मागणीही करण्यात आली होती.