नवी दिल्ली -कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 965 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकारी समिती बैठक घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात चर्चा केली. यावेळी बैठकील काँग्रेसमधील वरिष्ठ नेते उपस्थित होते.
देशभरामध्ये लॉकडाऊन करणे गरजेचे होते. मात्र, हे करताना पूर्वनियोजन करण्यात आले नव्हते. यामुळे संपूर्ण देशभरातील स्थंलातरित कामागारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
सोनिया गांधी बरोबरच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग , काँग्रेस नेते राहुल गांधी आदींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, 'देशत सध्या अभूतपूर्व आरोग्य आणि मानवतावादी संकट आले आहे. जरी हे आव्हान मोठे असले तरी, त्यावर मात करण्याचा आपला संकल्प दृढ हवा, असे सोनिया गांधी म्हणाल्या.