महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेएनयू हिंसाचार : दीपिकाच्या समर्थनार्थ उतरली सोनाक्षी सिन्हा, केले 'हे' टि्वट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दीपिकाचे समर्थन केले आहे. दीपिकाने विद्यार्थ्यांची घेतलेली भेट कौतूकास्पद असून ही वेळ शांत बसण्याची नाही, असे सोनाक्षीने टि्वटमध्ये म्हटले.

दीपिका-सोनाक्षी
दीपिका-सोनाक्षी

By

Published : Jan 8, 2020, 9:23 PM IST

नवी दिल्ली - जेएनयूमध्ये हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण मंगळवारी विद्यापीठात पोहोचली होती. त्यावरून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दीपिकाचे समर्थन केले आहे. दीपिकाने विद्यार्थ्यांची घेतलेली भेट कौतूकास्पद असून ही वेळ शांत बसण्याची नाही, असे सोनाक्षीने टि्वटमध्ये म्हटले.

कोणत्या पक्षाला तुमचा पाठींबा आहे. या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तुम्ही हिंसेला समर्थन करता का, विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची रक्ताने माखलेली छायाचित्रे तुम्हाला विचलित करत नाहीत का, दीपिकाने विद्यार्थ्यांची घेतलेली भेट कौतूकास्पद आहे. हातावर हात ठेऊन शांत बसण्याची ही वेळ नाही, असेही सोनाक्षीने टि्वटमध्ये म्हटले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी संध्याकाळी झालेल्या हिंसाचाराचा अनेक बॉलिवूड कलाकारांनी निषेध केला. दीपिका आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच दिल्ली पोहोचली होती. यादरम्यान मंगळवारी दीपिका जेएनयूच्या समर्थनार्थ उतरली आणि विद्यार्थी संघाच्या अध्यक्षाला भेटली. या भेटीनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले असून एक गट दीपिकाला पाठींबा देत आहे. तर दुसरा गट दीपिकाचा विरोध करत छपाकवर बहिष्कार टाकण्याची भाषा करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details