लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पब्जी मोबाईल गेम खेळण्यास मनाई केल्याने, एका मुलाने आपल्या वडिलांची गळा चिरला. वडिलांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सोमवारी याबाबत माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वारंवार पब्जी खेळण्यावरुन इरफान आपला मुलगा आमीरला ओरडत असत. त्यामुळे चिडून आमीरने घरातील चाकू घेत त्यांच्या मानेवर दोन-तीन वेळा वार केले. वडिलांचा गळा चिरल्यानंतर या मुलाने स्वतःच्या गळ्यावरही चाकू मारुन घेतला. सध्या या दोघांनाही मेरठच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.