लखनऊ- उत्तर प्रदेशच्या घोसी विधानसभा मतदारसंघातून, मागच्या निवडणुकांमध्ये फागू चौहान निवडून आले होते. त्यांना बिहारचे राज्यपाल पद दिले गेल्यामुळे आता होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी, या मतदार संघातून त्यांच्या मुलाला तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपने या मतदारसंघातून एका भाजीवाल्याच्या मुलाला तिकीट दिल्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
या मतदारसंघातून तिकीट मिळण्यासाठी बरेच मोठे नेते प्रयत्नशील होते. मात्र, पक्षाने या सर्वांना डावलून एका भाजीवाल्याच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. विजय राजभर असे या उमेदवाराचे नाव आहे. राजभर हे भाजचे नगराध्यक्ष आहेत. तसेच पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
हेही वाचा : अजब फतवा : नवरात्र उत्सवात आधार कार्ड सोबत घेवून या; बजरंग दलाचा जातीय 'गरबा'