महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बकऱ्या चोरून नेऊन कापल्याच्या संशयातून दोघांना बांधले झाडाला, गुन्हा दाखल - गिरिडीह में दलित छळ प्रकरण बातमी

गिरिडीह जिल्ह्यातील मुफस्सिल ठाण्यांतर्गत बकरे कापण्याच्या आरोपात अनुसूचित जातीच्या दोघांना छळल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

युवकांचा चेहरा ब्लर करावा
युवकांचा चेहरा ब्लर करावा

By

Published : Aug 2, 2020, 2:58 PM IST

रांची (झारखंड) -गिरिडीह जिल्ह्यातील मुफस्सिल ठाण्यांतर्गत बकरे कापण्याच्या आरोपात अनुसूचित जातीच्या दोघांना छळल्याचा प्रकार घडला आहे. बकऱ्यांच्या चोरी प्रकरणात पंचायतने दोघा तरुणांना झाडाला बांधले. या बाबात पीडितांनी शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी त्या दोघांच्या तक्रारीवरून गावच्या सरपंचासह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर त्या दोघा तरुणांविरोधात बकरे चोरुन कापल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाख झाला आहे. या घटनेची तक्रार शनिवारी मुख्यमंत्र्यांकडेही करण्यात आली आहे.

परस्पर विरोधी तक्रार केली दाखल

त्या दोन तरुणांच्या असे म्हणणे आहे की, दोन बकरे त्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्याने त्यांनी बकऱ्यांना हकलले. मात्र, काहींनी ते बकरे मारले त्यानंतर आमच्यावर 29 जुलैला आरोप करत पंचायत बोलावली. त्यानंतर एका झाडाला बांधून ठेवले. इतकेच नाही तर दंड ठोठावून गावकऱ्यांनी अंगावर थुंकल्याचेही त्या दोघांनी आरोप केले आहेत.

तर तरुणांनी ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे दोन बकर त्या दोन युवकांनी मारले आणि फस्त केले. याबाबत पंचायतीत सुनावणी झाली. पंचायत प्रकरण मिटवले. युवकांचे आरोप खोटे असून त्यांना झाडाला बांधले नाही.

सरपंच म्हणतात लोकांनी झाडाला बांधले मी तर सोडवले

याबाबत सरपंच बालेश्वर यादव म्हणाले, 28 जुलैला बकरे कापण्याची तक्रार प्राप्त झाली. यावर 29 जुलैला पंचायत बोलविण्यात आली होती. पंचायतमध्ये मोठी गर्दी होती. दरम्यान, काही लोकांनी त्या दोन तरुणांना झाडाला बांधले. त्यांना लागलीच सोडविण्यात आले. दरम्यान, याबाबत युवकांनी याबाबत तक्रार केली. हे सर्व राजकीय द्वेषातून केले जात असल्याचे आरोप सरपंचांनी केले आहेत.

पहिले मिटवले नंतर केली तक्रार

ठाणे प्रभारीने सांगितले, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. दोन्ही पक्षांना ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर दोघांनी आपापसात हे प्रकरण मिटविण्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर दोघांनीही परस्पर विरोधी तक्रार दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details