नवी दिल्ली - गांधीजींच्या नावाचा वापर करून काही लोक, देशाला त्यांनी दाखवून दिलेल्या पथावरून नव्हे तर, आपल्याला हव्या त्या मार्गावरून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. असे बरेच लोक देशात याआधीही होऊन गेलेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये साम-दाम-दंड-भेद या नीतींचा वापर करून हे लोक स्वतःला खूपच शक्तीशाली समजू लागले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या आज गांधीजयंतीनिमित्त बोलत होत्या.
भारत आणि गांधी हे जणू एकमेकांना पर्यायी शब्द आहेत. मात्र, आजकाल काही लोक याच्या अगदी उलट करण्याच्या प्रयत्नात आहेत. गांधी नव्हे, तर आरएसएस हे भारताचे प्रतीक व्हावे अशी काही लोकांची इच्छा आहे, असे म्हणत त्यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली आहे.