बंगळुरू - कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर अखेर येडियुरप्पा यांनी राज्यात भाजपचे सरकार स्थापन केले. या राजकीय नाट्यात आणखीन एक व्टिस्ट आला आहे. जेडीएसच्या आमदारांनी कुमारस्वामी यांना भाजपला बाहेरून पाठींबा देण्याची मागणी केली आहे.
कर'नाटक'चा अंक दुसरा : जेडीएसच्या आमदारांनी केली भाजपला बाहेरून पाठींबा देण्याची मागणी - जी.टी. देवेगौडा
जेडीएसच्या आमदारांनी कुमारस्वामी यांना भाजपला बाहेरून पाठींबा देण्याची मागणी केली आहे.

जेडीएसच्या आमदारांनी शुक्रवारी बैठक घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना आमदारांनी भाजपला पाठींबा देऊन आपले सरकार वाचवावे असे मत व्यक्त केले. तर काही आमदारांनी भाजपच्या विरोधी गटात राहावे असे सुचवले आहे. आमदारांनी अंतिम निर्णय कुमारस्वामी यांच्यावर सोडला आहे, अशी माहिती जेडीएसचे नेते जी.टी. देवेगौडा यांनी दिली.
विश्वासदर्शक ठरावात भाजपच्या बाजूने १०५ मते पडली तर काँग्रेस पक्षाला ९९ मते मिळाली. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस-जेडी(एस)चे सरकार कोसळले. काँग्रेस-जेडी(एस)चे सरकार बहुमत चाचणीत फेल झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.