नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर आपला राग व्यक्त केला आहे. काश्मीरमधील नागरिक गेल्या ७५ दिवसांपासून लष्करी वेढ्यामध्ये आहेत. जर काश्मीरमधील लष्कर हटवले तर तिथे मोठा खुनखराबा होण्याची भिती मोदींना आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ७५ दिवसांपासून मोदी सरकारने वेढा लावला आहे. मोदी वाघाची सवारी करत आहेत. मोदींना वाटते की, लष्कराचा वापर करुन काश्मींरीना शांत करतील. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्हाला लष्कराची गरज नाही, मात्र तुम्हाला काश्मीरींना दहशत दाखवण्यासाठी त्याची गरज आहे, असे त्यांनी पहिल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.