श्रीनगर : जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात असणाऱ्या नौशेरा भागामध्ये आज दुपारच्या सुमारास सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार आणि ग्रेनेड हल्लेही केले आहेत. यामध्ये भारताच्या एका जवानाला वीरमरण प्राप्त झाले आहे.
"आज दुपारी साडेतीन आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याला आपल्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, आपल्या एका जवानाला यात वीरमरण प्राप्त झाले" अशी माहिती लष्कराच्या एका प्रवक्त्याने दिली.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नायब सुभेदार रविंदर हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांना वीरमरण प्राप्त झाले, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
पाच हजारांहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन..