पुलावामा - जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळी चकमक झाली. या मध्ये एका जवानाला वीरमरण आले आहे. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.
या चकमकी दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एके- 47, रायफल, ग्रेनेड जप्त केले आहेत. सध्या या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे.
पुलवामा जिल्ह्यातील कमराझीपुरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलास मिळाली होती.त्यानुसार त्यांनी आज पहाटेच शोधमोहीम सुरू केली होती. त्यानंतर दहशतवाद्यानी अचानक गोळीबार सुरू केल्याने ही शोध मोहीम चकमकीत बदलली. या चकमकीत जखमी झालेल्या जवानांना तात्काळ लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका जवानास चकमकी दरम्यान वीरमरण आले आहे.
दरम्यान येथील बडगाम जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि जम्मू पोलिसांनी संयुक्त रित्या मंगळवारी रात्री शोध मोहीम सुरू केली. ती सध्या सुरू आहे. कमराझीपुरा येथील चकमक सुरू झाल्यानंतर त्या पथकाला ही सूचित करण्यात आले आहे