महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुर्यग्रहण : चारधाम मंदिर आज रात्री 10 वाजेपासून रविवारी दुपारपर्यंत बंद राहणार

सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील चारधाम मंदिरं आज रात्री 10 वाजेपासून रविवारी दुपारपर्यंत बंद राहतील.

By

Published : Jun 20, 2020, 4:15 PM IST

बद्रीनाथ-केदारनाथ
बद्रीनाथ-केदारनाथ

नवी दिल्ली - सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील चारधाम मंदिरे आज रात्री 10 वाजेपासून रविवारी दुपारपर्यंत बंद राहतील. सूर्यग्रहणामुळे बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्री-यमुनोत्री मंदिर आज रात्री 10 वाजेपासून बंद असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बद्रीनाथ धामचे पुजारी भुवन चंद्र उनियाल म्हणाले की, उद्या सूर्यग्रहण असले तरी त्याचे 'सुतक' 12 तासांपूर्वी सुरू होते. त्यामुळे रात्री 10.25 पासून ते रविवारी दुपारी 1.53 वाजेपर्यंत सुतक राहील. रविवारी दुपारी दोननंतर चारधाम मंदिरांचा परिसर स्वच्छ करूनच प्रार्थना केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

रविवार 21 जून रोजी भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण तर महाराष्ट्रात खंडग्रास ग्रहण पाहण्याची पर्वणी आहे. पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतून ते कंकणाकृती स्वरूपात दिसेल. हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.

ABOUT THE AUTHOR

...view details