थुथुकुडी -तामिळनाडूतील थुथुकुडी येथे एका जोडप्यांची आंतरजातीय विवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विवाहित महिला तीन महिन्यांची गर्भवती होती.
आंतरजातीय लग्नाच्या रागातून अज्ञात लोकांनी एका जोडप्याची हत्या केली आहे. सोलीराजन (वय 24 वर्षे ) आणि ज्योती (वय 21 वर्षे ) असे या पती पत्नीचे नाव आहे. सोलीराजन हा परायर समाजातील होता. तर ज्योती ही पल्लार समुदायातील होती.
हे दोघेही मीठाच्या कंपनीमध्ये कामाला होते. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, कालांतराने या मैत्रिचे रुपांतर प्रेमात आणि नंतर प्रेमाचे रुपपांतर लग्नात झाले. यावेळी सोलीराजन यांच्या कुंटुंबाने लग्नाला मंजुरी दिली. मात्र ज्योतीच्या घरच्यांनी या लग्नाचा विरोध केला होता. यावर ज्योतीने एप्रिलमध्ये आपले घर सोडले आणि सोलीराजन सोबत लग्न केले.
ज्योतीचे पिता अलागर यांचा लग्नाला विरोध असल्याने थुथुकुडी पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. सोलीराजन आणि ज्योती यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी थुथुकुडी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.