शिमला- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव बघता सामाजिक कार्यकर्ते सचिन डोंगर यांनी पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्याची शपथ घेतली आहे.
शिमलात सामाजिक कार्यकर्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना फ्री वाटताहेत मास्क आणि सॅनिटायझर - Municipal Corporation Commissioner Pankaj Rai news
शहरात ११०० स्वच्छता कर्मचारी असून त्यांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवणे गरजेचे असल्याचे पंकज राय सांगतात. या कठीण काळात लोकांनी पुढे यावे, असे आवाहन पालिका आयुक्त पंकज राय यांनी केले.
राज्यात पोलिसांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लाखो मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले आहे. मंगळवारी, सचिन डोंगर यांनी बारा हजार मास्क आणि ११०० सॅनिटायझर पालिका आयुक्तांना सोपवले. सफाई कर्मचारी या कठीण प्रसंगात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. त्यांना वाटप करण्यासाठी हे मास्क आणि सॅनिटायझर पालिका आयुक्तांना दिल्याचे डोंगर सांगतात.
शहरात ११०० स्वच्छता कर्मचारी असून त्यांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवणे गरजेचे असल्याचे पंकज राय सांगतात. या कठीण काळात लोकांनी पुढे यावे, असे आवाहन पालिका आयुक्त पंकज राय यांनी केले.