कुल्लू (हिमाचल प्रदेश) -लाहौल-स्पीती आणि कुल्लू मनालीच्या डोंगराळ भागात रविवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. यामुळे रोहतांग व बारालाचासह घाटी परिसरात निसर्गाने अगदी मुक्त हस्ताने शुभ्र उधळण केली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सद्या परिसरातील डोंगरावर बर्फांची पांढरी शुभ्र चादर दिसत आहे.
डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असल्याने परिसरात थंडीची लाट पसरली आहे. केलांगमधील 'लेडी ऑफ केलांग' या डोंगरी भागावर बर्फाची पांढरी शुभ्र चादर पाहायला मिळत आहे. शिकुलासह, घेपन पीक, कोकसर जोत, बारालाचा, कुंजम, लहान व मोठा शिगडी ग्लेशियर, दारचा येथील डोंगर, नीलकंठ जोतसह परिसरातील डोंगराळ भाग बर्फमय झाला आहे.