श्रीनगर - गेल्या आठवड्यापासून जम्मू आणि काश्मीर मध्ये तापमानाने निचांक गाठला आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद आहे. गेले दोन दिवस सतत बर्फवृष्टी झाल्याने जनजीवन खोळंबले आहे. येणाऱ्या दोन दिवसांतही हे प्रमाण कायम राहणार असून पुढील 24 तासांत परिस्थिती आणखी खालवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीला सुरुवात; जनजीवन विस्कळीत - काश्मीर खोरे बर्फवृष्टी
गेल्या आठवड्यापासून जम्मू आणि काश्मीर मध्ये तापमानाने निचांक गाठला आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद आहे.
काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीला सुरुवात
याचा विपरीत परिणाम विमानांच्या उड्डाणावर झाला आहे. गेल्या सात दिवसांपासूनच विमान वाहतुकीवर खराब झालेल्या हवामानाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. यामुळे स्थानिकांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.