काश्मीरमध्ये सरसकट मोबाईल एसएमएस सेवेसह सरकारी रुग्णालयातील इंटरनेट पूर्ववत - एसएमएस सेवा सुरू काश्मीर
जम्मू काश्मीरमधील सर्व मोबाईल फोनची एसएमएस म्हणजेच संदेश वहन सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. याबरोबरच सरकारी रुग्णालयातील ब्राडबँड इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली आहे.
एसएमएस सेवा सुरू
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सर्व मोबाईलची एसएमएस म्हणजेच मेसेज सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. याबरोबरच सरकारी रुग्णालयातील ब्राडबँड इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली आहे. ५ ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्याची स्वायत्ता काढून घेतल्यानंतर इंटरनेट सेवा, लँडलाईन आणि मोबाईल सेवा खंडित करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी मध्यरात्री काही सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.