श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील नागरिकांवर सुरक्षेच्या कारणास्तव लादण्यात आलेल्या बंधनांमध्ये थोडी सुट देण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेशातील फोन आणि एसएमएस म्हणजेच संदेश सेवा सुरळीत करण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा फक्त स्थानिक प्रीपेड सीम कार्डवर देण्यात आली आहे. तर १० जिल्ह्यात अंशत: इंटरनेट सेवा सुरु ठेवण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीर : प्रीपेड मोबाईलवरील 'व्हाईस कॉल' व एसएमएस सेवा पूर्ववत
जम्मू काश्मीरमधील नागरिकांवर सुरक्षेच्या कारणास्तव लादण्यात आलेल्या बंधनांमध्ये थोडी सूट देण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेशातील फोन आणि एसएमएस म्हणजेच संदेश सेवा सुरळीत करण्यात आली आहे.
काळजीपूर्वक सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे राज्याचे मुख्य सचिव रोहीत कंसल यांनी सांगितले. २ जी इंटरनेट सेवा १० जिल्ह्यांमध्ये सुरूच ठेवण्यात येणार आहे. मात्र, ठराविक संकेतस्थळेच नागरिकांना वापरता येणार आहेत. जम्मू, कुपवाडा, बंदीपोरा आणि काश्मीर विभागातील १० जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर बडगाम, गंदेरबाल, बारामुल्ला, श्रीनगर, कुलगाम, अनंतनाग, शोपिया आणि पुलवामा जिल्ह्यात इंटरनेट सुविधा बंदच राहणार आहे.सरकारने आज नजरकैदेत ठेवलल्या ४ राजकीय नेत्यांचीही आज मुक्तता केली आहे. मागील आठवड्यात अंशत इंटरनेट सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये सुरक्षेचा आढावा घेऊन वेळोवेळी बदल करण्यात येत आहे.