अमेठी- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जवळचे असलेले सुरेंद्र सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यावर स्मृती इराणी म्हणाल्या, सुरेंद्र सिंह यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची माझी तयारी आहे. सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबासमोर मी या गोष्टीचा संकल्प केला आहे. मी दोषींना कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.