महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्मृती ईराणी म्हणातात.. महिला विकासाच्या माध्यमातून केंद्र सरकार करतेय राष्ट्र विकास - central minister

असे एखादे सरकार येईल, जे कुटुंबासाठी योजना बनवून निर्धारित वेळेपूर्वी लक्ष प्राप्त करणारे असेल. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली तरीही त्यांचे कार्य पैशात तोलले जाऊ शकत नाही, असे मत केंद्रीयमंत्री ईराणी यांनी व्यक्त केले आहे.

यशस्विनी योजनेचा शुभारांभ
यशस्विनी योजनेचा शुभारांभ

By

Published : Jan 11, 2020, 11:33 PM IST

पणजी- केंद्र सरकार महिलांच्या विकासाच्या माध्यमातून राष्ट्र विकास करत असल्याचा आवाज देशभर गुंजत आहे. तसेच कोणालाही अपेक्षित नव्हते की, असे एखादे सरकार येईल, जे कुटुंबासाठी योजना बनवून निर्धारित वेळेपूर्वी लक्ष प्राप्त करणारे असेल. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली तरीही त्यांचे कार्य पैशात तोलले जाऊ शकत नाही, असे मत केंद्रीयमंत्री ईराणी यांनी व्यक्त केले.

स्मृती ईराणी म्हणातात.. महिला विकासाच्या माध्यमातून केंद्र सरकार करतेय राष्ट्र विकास

गोवा सरकारच्या महिला आणि बालविकास संचालनालयाच्या 'स्वास्थ सखी आणि स्तन कर्करोग तपासणी' प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम ताळगाव पठारावलील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य, महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे, आरोग्य सचिव नीला मोहनन, चोखाराम गर्ग,डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, प्रॉप्टर अँड गँम्बलचे मिलिंद थत्ते, गोवा वैद्यकीय महाविद्यालयायाचे डिन डॉ.. शिवानंद बांदेकर, कर्करोग तज्ञ अनुपमा बोरकर आणि डॉ. जो डिसा आदी उपस्थित होते.

महिलांना घरच्या घरी आरोग्य तपासणी करता यावी यासाठी कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबल उपक्रामांतर्गत प्रॉप्टर अॅण्ड गॅम्बल यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ज्यामध्ये एका किटमध्ये महिलांचे प्राथमिक आरोग्य तपासणी करणे शक्य आहे, अशी उपकरणे असतील. ज्यामुळे दुर्गम भागातील महिलानांही याचा उपयोग होईल. ही योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविली जाणार आहे. वर्षभरात 20 हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे इराणी यांच्या हस्ते किटचे अनावरण केल्यानंतर एका अंगणवाडी सेविकेला प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आले. त्यानंतर गोवा सरकारची महिलांना आर्थिक सक्षम करणाऱ्या 'यशस्विनी' योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेद्वारे महिला मंडळ अथवा बचत गट यांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले उपलब्ध होणार आहे. ज्याचा पहिला वर्षी परतावा करावा लागणार नाही.

एक पाऊल पुढे टाका, सरकार मदत करण्यासाठी तत्पर-

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की अंगणवाडी महिलांचे योगदान विचारात घेऊन येत्या अर्थसंकल्पात त्यांचे मानधन काही प्रमाणात वाढविले जाणार आहे. तसेच निवृत्तीचे वय 60 वरून किमान दोन वर्षे तरी वाढवावे, असे सरकारच्या विचाराधीन आहे. महिलेला जर कर्करोग होण्याची लक्षणे असतील तर ती लवकरात लवकर समजली तर त्यावर उपचार करणे शक्य आहे. यासाठी हा उपक्रम आहे. तर महिला उद्योजकांना प्रगतीसाठी हात देण्याकरिता यशस्विनी योजना आहे. आपण एक पाऊल पुढे टाका सरकार मदत करण्यासाठी तत्पर आहे. कारण महिला सक्षमीकरण झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details