पंतप्रधान मोदी आसिआन शिखर परिषदेसाठी बँकॉकमध्ये सर्वोच्च नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका करत आहेत. तर भारत आणि भागधारक देशांचे वरिष्ठ सरकारी अधिकारी प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी(आरसीईपी) मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी रात्री जागून काढत आहेत.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार, भारताकडून नव्याने मागणी झाल्यानुसार अधिकारी पडद्याआड राहून झालेली आतापर्यंत झालेली प्रगती वाया जाऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. आरसीईपीमध्ये प्रस्तावित एफटीएने (मुक्त व्यापार करार) एकदा आकार घेतला की, ज्यात आसियानचे दहा देश आणि एफटीएचे सहा भागीदार ज्यात भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड यांचा समावेश आहे. सर्वात मोठा प्रादेशिक व्यापार गट होणार आहे. आर्थिक परिवर्तन घडवणारा सिद्ध होऊ शकतो.
आरसीईपीमध्ये सहभागी असलेले १६ देशांचा जीडीपी जागतिक एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या(जीडीपी) एक तृतीयांश असेल आणि जगाच्या अर्ध्या लोकसंख्येचा आणि ट्रिलिअन डॉलर व्यापाराचा समावेश त्यात असेल. दक्षिण आशियाई नेत्यांसमवेत बैठकीत सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि आसियान देश यांच्यातील सध्याच्या व्यापार करारांचे पुनरावलोकन करण्याची गरज अधोरेखित केली होती.