राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दाट, उदास धुक्यानंतर आज अनेक दिवसांनी सूर्यदर्शन झाले आणि हवेच्या तीव्र प्रदूषणामुळे सक्तीने विश्रांती घ्यावी लागलेल्या शाळाही सुरू झाल्या. परंतु, दरवर्षी या काळात अशाच प्रकारांची पुनरावृत्ती होत आल्याने दिल्लीतील विदेशी राजनैतिक अधिकारी चिंतीत झाले असून, गेल्या काही आठवड्यात प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत घातकरित्या असह्य झाले आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या तुकडीचे प्रमुख सध्या प्रवास करत असून, या आठवड्यात ते दिल्लीला परतल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार काही कल्पना आणि पर्यावरणावर उपाययोजना टेबलवर आणतील, अशी आशा आहे.`` मी फक्त एवढेच सांगू शकतो की, राजनैतिक अधिकारी त्याच हवेत श्वास घेतात ज्या हवेत दिल्लीचे नागरिक श्वास घेतात आणि इतर प्रत्येकाप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते.
यावर परिस्थिती कशी सुधारता येईल, यासाठीच्या कल्पनावर आम्ही परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करणार आहोत कारण, याचा परिणाम केवळ दिल्लीच्या लोकांवरच होत नाही तर आमच्या देशातील लोक जे भारताला व्यवसाय किंवा पर्यटनासाठी भेट देण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यावर होत आहे.’’ असे फ्रँक एचडी कॅस्टेलानोस यांनी इटीव्ही भारतला सांगितले.
२०१७ मध्ये राजदूत कॅस्टेलानोस यांनी परराष्ट्र मंत्रालयात जाऊन दिल्लीतील हवाई प्रदूषणामुळे राजनैतिक अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत निषेध करून भारताची राजनैतिक अडचण केली होती. तेव्हा काही दूतावास आणि उच्चायुक्तालयाच्या कर्मचार्यांनी आपल्याला तसेच कुटुंबियांना श्वसन करण्यास त्रास होत असून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याची माहिती दिली होती.
दोन आसियान सदस्य देशांच्या राजनीतिक अधिकार्यांना तर आपली दिल्लीतील नेमणूक मुदतीआधीच गुंडाळावी लागली होती आणि काही अधिकार्यांनी आपल्या सुट्ट्या बराच काळ वाढवल्या होत्या.
२०१७ मध्ये थायलंड दुतावासाने आपल्या परराष्ट्र मंत्रालय मुख्यालयास भारतातील नेमणूक अवघड नेमणूक असल्याचे जाहीर करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी लिहिले होते. तर कोस्ता रिकनचे प्रतिनिधी मारीएला क्रुझ अल्वारेझ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून, दिल्लीतील परदेशी दूतावासानी आपले राजनैतिक अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी अंतर्गत खबरदारी घेण्यास सुरूवात केली.
ईटीव्ही भारतशी बोलताना दिल्लीतील फ्रेंच दूतावासाचे प्रवक्ते रेमी तीरौतोउवारायने यांनी सांगितले की, फ्रेंच दूतावासाने इमारत हवा शुद्ध करण्याच्या साधनांनी सुसज्ज राहील, याचीखात्री करण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत. परिस्थिती असे दर्शवते की, ग्रहासाठी भारत आणि फ्रान्स यांची भागीदारी अचूक आहे.
गेल्या आठवड्यात आमचे पर्यावरण मंत्री आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या आमसभेसाठी दिल्लीत होते आणि पर्यावरण आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यासाठी मंत्री जावडेकर यांची भेटही घेतली.