नवी दिल्ली - दिल्ली येथील अवघ्या दीड महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजशी जोडलेले कलावती सरन रुग्णालयातील अती दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर या बाळाने रविवारी शेवटचा श्वास घेतला. आत्तापर्यंत हा कोरोनाचा सर्वाधिक लहान वयाचा बळी ठरला आहे.
देशातील कोरोनाचा सर्वात लहान बळी, दिल्लीतील दीड महिन्याचा बाळाचा मृत्यू
एक दिवस आधीच या बाळाच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
देशातील कोरोनाचा सर्वात लहान बळी, दिल्लीतील १० महिन्याचा बाळाचा मृत्यू
माहितीनुसार, एक दिवस आधीच या बाळाच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १० महिन्याच्या आणखी एका बाळाला कोरोनाची लागण झालेली आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
रुग्णालयातील सर्व अतीदक्षता विभागांना सॅनिटाईझ करण्याचे काम सुरू होणार आहे. तसेच, येथे इतरही लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.